छोट्याशा दुर्लक्षाची किंमत 61 अब्ज रुपये! | पुढारी

छोट्याशा दुर्लक्षाची किंमत 61 अब्ज रुपये!

सेंट लुईस : वाहने आपण सर्वच जण चालवतो आणि यादरम्यान कोणतीही चूक होऊ नये, यासाठी पूर्ण दक्ष असतो. पण, तरीही काही वेळा नकळत चूक होते. अर्थात, अशी छोटीशी चूक किती महागडी ठरू शकते, याचा अमेरिकेतील एका घटनेत चांगलाच प्रत्यय आला आहे. कारण, एका छोट्या चुकीमुळे त्यात वाहनचालकाला थोडाथोडका नव्हे तर 61 अब्ज रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण अमेरिकेतील आहे. सेंट लुईस येथे राहणारी 25 वर्षीय मारिसा पॉलिटे एक दिवस आपल्या कार्यालयाकडे निघाली होती. त्याचवेळी एक कार तेथे आली आणि तिला चिरडून निघून गेली. मारिसाला रक्तबंबाळ परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तिला वाचवण्यात यश आले नाही.

पोलिसांनी चौकशी सुरू केली, त्यावेळी असे निदर्शनास आले की, एक 20 वर्षीय युवक कार चालवत होता आणि या घटनेपूर्वी त्याने व्हिप-लिट घेतले होते, ज्यात नाईट्रस ऑक्साईड असते. याला लॉफिंग गॅस नावानेही ओळखले जाते. नंतर असे स्पष्ट झाले की, गाडी चालवत असताना व्हिप-लिटमुळे त्याला अचानक डुलकी लागली आणि कारवरील नियंत्रणच सुटले.

संबंधित बातम्या

यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि कंपनी यातून विष विकत असल्याचा आरोप त्यात केला गेला. न्यायालयात कंपनी दोषी आढळली आणि त्यांना 745 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला. नायट्रस ऑक्साईड घेतल्याने चक्कर येणे, डोकेदुखी व अगदी शुद्ध हरपणे, असेही होऊ शकते. जगभरातील अनेक देशांनी त्याचा साठा करण्यासही बंदी घातली आहे. याचे उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षादेखील होऊ शकते.

Back to top button