पुणे : वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर दुरगामी परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने 'हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील परिणाम' हा विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत राज्यातील 17 शहरांमध्ये श्वसनविषयक आजारांच्या रुग्णांचा अभ्यास करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील परिणाम या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांचा अभ्यास केला जात आहे. अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या 17 शहरांमधील हवेची गुणवत्ता, शासकीय रुग्णालयांमधील श्वसनाच्या आजाराचे रुग्ण याबाबत माहिती संकलित केली जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने सर्व जिल्ह्यांमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. श्वसनाशी संबंधित आजारांच्या उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण, त्यांच्यातील लक्षणे, आजारांची तीव्रता, औषधोपचार आदींचा तुलनात्मक अभ्यास केला जात आहे. अभ्यासातील निष्कर्ष आरोग्य विभागाला धोरणे ठरवण्याच्या द़ृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत.
प्रकल्पांतर्गत वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांचे निरीक्षण केले जात आहे. यामध्ये संबंधित शहरांतील हवेच्या गुणवत्तेच्या पातळीचा श्वसनाच्या आजारांशी संबंध समजून घेण्यास मदत होत आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असलेली माहिती राज्य पातळीवर एकत्रितपणे वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांचा कल समजून घेण्यास मदत करेल.
जिल्हा रुग्ण
अकोला 247
अमरावती 24
औरंगाबाद 22
चंद्रपूर 7
जळगाव 65
जालना 0
कोल्हापूर 52
लातूर 126
मुंबई 411
नागपूर 33
नाशिक 31
पुणे 27
सांगली 404
सोलापूर 205
ठाणे (3 केंद्रे) 236
हेही वाचा