पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीबी, एटीसीला अलर्ट

पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीबी, एटीसीला अलर्ट
Published on
Updated on

पिंपरी : राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. मंगळवार (दि. 19) पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी कोथरूड येथे स्थानिक पोलिसांनी पाच लाखांचे बक्षीस असलेल्या ममोस्ट वॉन्टेडफ दहशतवाद्यांना जेरबंद केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील एटीबी (दहशतवाद विरोधी शाखा) आणि एटीसी (दहशतवाद विरोधी सेल) यांना अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, समाजविघातक कृत्यांवर विशेष लक्ष देण्याचे आदेश महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडसह राज्यभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे.

गणेशभक्तांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. मोठ्या गणेशमंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आहे. यासाठी खात्यातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. महासंचालक कार्यालयानेदेखील घटकप्रमुखांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकंदरीतच पुण्यातील कोथरूड भागात सापडलेल्या दहशतवाद्यांमुळे यंदा अधिकची खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी
यंदा गुरुवारी म्हणजेच 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. तसेच, यंदा मुस्लिमबांधवांचा ईद- ए- मिलाद सणदेखील 28 सप्टेंबरलाच आहे. दोन्ही सण-उत्सव एकाच दिवशी येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मुस्लिमबांधवानी ईद- ए- मिलादची आपली मिरवणूक एक दिवस पुढे ढकलली आहे.

शहराच्या कोणत्याही भागात सक्रिय असलेल्या राष्ट्रद्रोही घटकांबद्दल माहिती गोळा करणे. तसेच, मिळालेल्या माहितीचा सखोल अभ्यास करण्याचे काम मफएटीबीफफ करीत असते. दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी एटीबीफफवरच असते. राज्यातील अन्य दहशतवाद विरोधी विभागांशी समन्वय साधून मफएटीबीफफतील अधिकारी काम करीत असतात. याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर काम करणार्‍या विभागाला मफएटीसीफफ नावाने ओळखले जाते. प्रत्येक पोलिस ठाण्यात मफएटीसीफफ कार्यरत आहे.

बीडीडीएसच नाही; तपासणी कशी ?
गणेशोत्सवात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर परिसरातील गर्दीच्या ठिकाणावर विशेष लक्ष देण्याबाबत महासंचालक कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. तसेच, बस आणि रेल्वे स्थानक, मोठ्या बाजारपेठा, मॉल या ठिकाणी बीडीडीएसकडून (बॉम्बशोधक नाशकपथक) तपासणी करण्याबाबत आदेशित केले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे अजूनही स्वतःचे मफबीडीडीएसफफ नाही. त्यामुळे पुणे शहर पोलिसांकडून येणार्‍या बीडीडीएसच्या भरवशावर कशी आणि किती ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महासंचालक विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे काम सुरू आहे. दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. एटीबी, एटीसी पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील सजग राहणे गरजेचे आहे. काही संशयित आढळून आल्यास नागरिकांनी नजीकच्या पोलिसांशी संपर्क साधावा.
                                     – विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

या दिवशी राहणार विशेष लक्ष
बाप्पांच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत गणेशभक्तांचा उत्साह कायम असतो. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. यंदा 20 सप्टेंबर रोजी दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी पाच दिवसांचे, 25 सप्टेंबर रोजी सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणेशांच्या विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत. या दिवशी स्थानिक पोलिसांसह गोपनीय पथकांची करडी नजर शहरावर असणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news