School Bus : पुण्यातील स्कूल व्हॅनचालकांना दणका; तब्बल 85 चालकांवर कारवाई | पुढारी

School Bus : पुण्यातील स्कूल व्हॅनचालकांना दणका; तब्बल 85 चालकांवर कारवाई

पुणे : विनापरवाना व्हॅनमधून (विविधरंगी) विद्यार्थ्यांची धोकादायकरीत्या वाहतूक करणार्‍या 85 चालकांवर आरटीओकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करीत चारचाकी वाहनांतून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येत असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले होते. त्यासोबतच अनेक पालकांनीदेखील याबाबत आरटीओकडे तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आरटीओकडून नुकतीच विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या मोहिमेंतर्गत आरटीओने पुणे शहरातील विविध भागांत अनधिकृतरीत्या शालेय वाहतूक करणार्‍या 85 व्हॅनचालकांवर कारवाई केली.

शालेय वाहतुकीचा परवाना नसतानाही अनधिकृतरीत्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या 85 व्हॅनचालकांवर कारवाई करण्यात आली. सुरक्षित विद्यार्थी वाहतूक लक्षात घेत ज्या वाहनांना शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना आहे, त्याच वाहनातून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे.

– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

हेही वाचा

जर्मनी टोळीच्या म्होरक्यासह साथीदाराचा पोलिस कोठडीतच जीवन संपवण्याचा प्रयत्न

Pune metro : पुणे मेट्रोचं काम जोमात! स्वारगेट ते शिवाजीनगर लवकरच धावणार मेट्रो

लाठीमार करणारे तीन पोलिस अधिकारी निलंबित; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री

Back to top button