तळेगावमधील पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

तळेगावमधील पाणीपुरवठा विस्कळीत

तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे परिसरातील गाव आणि स्टेशन भागात सतत पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. पाणी मुबलक असताना ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यातसुध्दा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

नागरिकांची गैरसोय

15 दिवसांपूर्वी पंप नादुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात सुमारे 4 ते 5 दिवस व्यत्यय आला होता. शुक्रवारी (दि. 8) एक्सप्रेस हायवेपासून सोमाटणे पंपहाऊसपर्यंत केबल नादुरुस्त झाल्यामुळे तळेगाव दाभाडे गाव व स्टेशन परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. कधी वीजपंप नादुरुस्त होतो तर कधी केबल नादुरुस्त होते. कधी मोटर पाण्याखाली जाते, अशा विविध कारणांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

महिलांना तर फारच त्रास होत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

प्रशासनाचा मनमानी कारभार

सध्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत मुख्याधिकार्‍यांबरोबर चर्चा करण्यात येईल.

आशिष खांडगे,
सामाजिक कार्यकर्ता.

हेही वाचा

2700 वर्षांपूर्वीचा ‘तो’ माणूस भूकंपाचा बळी!

कोट्यवधी रुपयांचा मासा!

पार्कमध्ये खेळताना सापडला हिरा!

Back to top button