2700 वर्षांपूर्वीचा ‘तो’ माणूस भूकंपाचा बळी! | पुढारी

2700 वर्षांपूर्वीचा ‘तो’ माणूस भूकंपाचा बळी!

इस्तंबुल ः पुरातत्त्व संशोधकांनी तुर्कीमध्ये एका प्राचीन माणसाचा सुस्थितीत असलेला सांगाडा शोधून काढला आहे. हा माणूस 2700 वर्षांपूर्वीचा असून तो या भागात त्यावेळी झालेल्या भूकंपाचा बळी ठरलेला असावा असे संशोधकांना वाटते. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे त्याचा अकालीच मृत्यू झाला होता.

इसवी सनापूर्वीच्या आठव्या शतकातील हा माणूस संपन्न कुटुंबातील होता. त्याने दागदागिने परिधान केले होते व त्याच्या अवतीभोवती शस्त्रे व कलाकृती आढळल्या आहेत. त्यामध्ये एका मुद्रेचाही समावेश आहे. भूकंपामुळे त्याच्या गढी किंवा किल्ल्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असे अतातुर्क युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ आर्कियोलॉजीमधील प्रमुख मेहमेत इसकिल यांनी सांगितले. तुर्कीच्या वान प्रांतातील अयानिस येथे त्याची गढी होती. हे युरेर्टियन केंद्राचे ठिकाण असून याठिकाणी लोहयुगात इसवी सनपूर्व नवव्या ते सहाव्या शतकापर्यंत युरेर्टु राजवट होती. सध्याच्या आर्मेनियापासून पश्चिम इराणपर्यंत हे राज्य होते. अयानी लोकांचा र्‍हास होण्यामागे मोठा भूकंप व त्यापाठोपाठ लागलेल्या आगीचे कारण असावे असे संशोधकांना नेहमीच वाटत आले आहे.

Back to top button