पुणे : द़ृष्टीबाधित खेळाडूही साधणार ‘नेम’; जर्मनीच्या टेक्नॉलॉजीचा वापर

पुणे : द़ृष्टीबाधित खेळाडूही साधणार ‘नेम’; जर्मनीच्या टेक्नॉलॉजीचा वापर
Published on
Updated on
पुणे : पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये दिव्यांग खेळाडू सहभागी होताना दिसून येतात. मात्र, नेमबाजी स्पर्धेपासून हे दिव्यांग खेळाडू, विशेषतः दृष्टीबाधित खेळाडू मागे पडत होते. आता जर्मनीतील टेक्नॉलॉजीने दृष्टीबाधित खेळाडूही 'नेम' साधू शकणार आहेत. देशात पहिल्यांदाच दृष्टीबाधित नेमबाज खेळाडूंसाठी भारतीय संघाचे प्रमुख जयप्रकाश नोटीयाल यांनी जर्मनी येथून दोन अत्याधुनिक यंत्रे आणली आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत दीड लाख रुपये आहे.
ती यंत्रे पुणे जिल्हास्तरीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय पॅरा नेमबाजी संघाचे डॉक्टर पवनकुमार यांच्या हस्ते पुण्यामध्ये सैन्यदलात असलेल्या लेफ्टनंट कर्नल दुर्गेश कुमार व बंगळुरूच्या पूर्वा यांना सरावासाठी मोफत देण्यात आली होती. त्यानुसार दृष्टीबाधित नेमबाज खेळाडूंनी पुण्यातील या स्पर्धेत त्यांचा वापरही केला आहे. या स्पर्धेत या खेळाडूंना पदक मिळाले नसले तरी नेम साधण्यात यशस्वी झाल्याने ते 13 सप्टेंबरपासून दिल्ली येथे होणार्‍या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

काय आहे तंत्रज्ञान?

जर्मनी येथून आलेल्या या यंत्राचा एक भाग एअर रायफलवर लावला जातो व हेडफोन कानाला लावतात. रायफलवर लावलेल्या यंत्रात सेन्सर असतात ते टार्गेटच्या निशाण्यावर रायफल आल्यावर हेडफोनद्वारे संकेत देते. त्यानंतर अंदाज घेऊन अचूक निशाणा साधायचा असतो. दृष्टीबाधित खेळाडूंना जेमतेम क्रीडा प्रकारात सहभागी होता येत होते, आता पॅरालिम्पिक दर्जाच्या खेळाची भर पडली आहे.
जिल्हास्तरीय पॅरा नेमबाजीत या दोन्ही दृष्टीबाधित खेळाडूंनी अचूक नेम साधला आहे. त्यामुळे त्यांची दिल्ली येथे होणार्‍या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील एक यंत्र पुणे पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुण्यातील दृष्टीबाधित खेळाडूंसाठी घेणार आहे. पॅरा ऑलिम्पिकसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दृष्टीबाधित खेळाडूंनाही सहभागी होता येणार असून, देशासाठी पदकही जिंकता येणार आहे.
– आकाश कुंभार, प्रशिक्षक, पॅरा नेमबाज
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news