इस्रायलमधील गुहेत 1900 वर्षांपूर्वीच्या रोमन तलवारी

इस्रायलमधील गुहेत 1900 वर्षांपूर्वीच्या रोमन तलवारी
Published on
Updated on

तेल अवीव : पुरातत्त्व संशोधकांनी इस्रायलमधील एका गुहेत तब्बल 1900 वर्षांपूर्वीच्या व अद्याप सुस्थितीत असलेल्या चार तलवारी शोधून काढल्या आहेत. ही शस्त्रे कदाचित बंडखोर ज्यू सैनिकांनी लढाईत शत्रूकडून जप्त करून ती गुहेत लपवली असावीत असे संशोधकांना वाटते.

ही शस्त्रे दुर्मीळ असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यापैकी तीन तलवारींचे पाते लोखंडी असून ते अद्यापही त्यांच्या लाकडी व कातडी मुठीत सुरक्षित आहे. या पात्यांची लांबी 24 ते 26 इंचांदरम्यान आहे. रोमन 'स्पाथा' तलवारींसारखीच त्यांची रचना आहे. चौथी तलवार छोटी असून तिचे पाते 18 इंच लांबीचे आहे. प्राचीन काळी ज्युडियामध्ये तैनात असलेल्या रोमन सैनिकांकडून या शस्त्रांचा वापर केला जात होता, अशी माहिती इस्रायल अँटिक्यूटीज अ‍ॅथॉरिटी (आयएए) ने दिली आहे. अशी एखादी तलवार सापडणेही अतिशय दुर्मीळ घटना ठरते. मात्र, इथे एकाच वेळी चार तलवारी सापडल्या आहेत, हे स्वप्नवतच आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

ज्युडियन बंडखोरांंनी या तलवारी हिरावून घेऊन त्या सध्याच्या उत्तर इस्रायलमधील एन गेडी नेचर रिझर्व्हमध्ये असलेल्या गुहेत लपवून ठेवल्या असतील असे त्यांनी म्हटले आहे. रोमन लोकांची सत्ता असलेल्या ज्युडियामध्ये इसवी सन 132 ते 135 या काळात 'बार कोखबा' ही बंडाची घटना घडली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news