Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वीर गोगादेव उत्सवानिमित्त कॅम्पमध्ये वाहतुकीत बदल | पुढारी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वीर गोगादेव उत्सवानिमित्त कॅम्पमध्ये वाहतुकीत बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कॅम्पातील वीर गोगादेव उत्सवानिमित्त न्यू मोदीखाना येथून मुख्य मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास निघणार असून, या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे वाहतूक शाखेने या ठिकाणच्या वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

वीर गोगादेव मुख्य मिरवणूक मार्ग

न्यू मोदीखाना रोडने पूलगेट पोलीस चौकी, मेढी माता मंदिर, महात्मा गांधी रोडने डावीकडे वळून कुरेशी मशिदसमोरून सेंट्रल स्ट्रिट रोडने सरळ भोपळे चौक ते सेंट्रल स्ट्रिट चौकी, उजवीकडे वळून महावीर चौक, महात्मा गांधी रोडने कोहीनूर हॉटेल चौक ते पूलगेट पोलीस चौकी, मेढी माता मंदिर येथे या मिरवणुकीचे विसर्जन होणार आहे.

बंद करण्यात आलेले मार्ग आणि पर्यायी रस्ते

वाय जंक्शन वरून महात्मा गांधी रोडकडे येणारी वाहतूक ही वाय जंक्शन येथे बंद करून ती खाणे मारुती चौक येथे वळवण्यात आली आहे. तसेच सोलापूर रोडला जाणारी वाहतूक ही खाणे मारुती चौक येथून उजवीकडे वळून जाईल व शहरात येणारी वाहतूक ही खाणे मारुती चौकातून सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकातून डावीकडे वळून महावीर चौक व तेथून पुढे एम.जी. रोडकडे जाईल किंवा इंदिरा गांधी चौकातून उजवीकडे वळून लष्कर पोलीस स्टेशन चौक व तेथून डावीकडे वळून तीन तोफा चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.

मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतूक ही बंद करून वाहतूक ही चुडामन तालीमकडे वळवण्यात येणार आहे.
होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकातून पुढे सोडण्यात येईल.

महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, वाहतूक एम.जी. रोडने नाझ चौकाकडे वळवण्यात येणार आहे. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून वाहतूक ताबूत स्ट्रिट रोडमार्गे पुढे सोडण्यात येईल.
बाबाजान चौकाकडून भोपळे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून वाहतूक शिवाजी मार्केटकडे वळवण्यात येणार आहे.

हेही वाचा

शस्त्र परवाना कसा काढतात, कशी आहे प्रकिया; घ्या जाणून?

Nashik: म्हसरुळ, पंचवटी, हिरावाडीत शनिवारी पाणीपुरवठा बंद

अहमदनगर : ‘अमृत 2’साठी महापालिकेचा 700 कोटींचा नवा प्रस्ताव

Back to top button