Nashik: म्हसरुळ, पंचवटी, हिरावाडीत शनिवारी पाणीपुरवठा बंद | पुढारी

Nashik: म्हसरुळ, पंचवटी, हिरावाडीत शनिवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील मनपाच्या जलशुध्दीकरण केंद्रातील सबस्टेशन व पंप हाऊसमध्ये विद्युतविषयक दुरूस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याने येत्या शनिवारी(दि.९) पंचवटी परिसरात सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी(दि.१०) देखील सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

महापालिकेच्या पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशनमध्ये व पंप हाऊसमध्ये विदयुत विषयक दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच महावितरण कंपनीचे फोर पोल स्ट्रक्चरवरील एबी स्वीच व डीओ सेट बदलावयाचे काम करावयाचे आहे. त्यामुळे पंचवटी परिसरातील प्र. क्र. एकमधील संपूर्ण म्हसरुळ शिवार, प्र. क्र. ४ व ५ मधील संपूर्ण मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्र.क्र. ६ मधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसर तसेच प्र.क्र. ३ मधील हिरावाडी व लगतचा परिसर आदी परिसरातील शनिवारी(दि.९) सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, तसेच रविवारी(दि.१०) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

हेही वाचा :

Back to top button