कोल्हापूर
कोल्हापुरात उद्यापासून 20 सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश
कोल्हापूर : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने, निषेध, मोर्चा, गाव बंद, रॅली इ. प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरूस, सण साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा आदींचे आयोजन केले जात असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता गुरुवारी (दि. 7) सकाळी सात वाजल्यापासून दि.20 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी हा आदेश काढला आहे.

