Rain Update : आज, उद्या राज्यात मुसळधार; ‘आयएमडी’च्या मुख्यालयाचे विशेष बुलेटीन | पुढारी

Rain Update : आज, उद्या राज्यात मुसळधार; ‘आयएमडी’च्या मुख्यालयाचे विशेष बुलेटीन

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण देशात आगामी चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता आहे. राज्यात बुधवारी व गुरुवारी बहुतांश भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या दिल्ली येथील मुख्यालयाने विशेष बुलेटीनव्दारे दिला आहे. मान्सून सध्या हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झालेला आहे.

उत्तरेत पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने त्या भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने संपूर्ण देशात 9 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकणात 6 ते 11 सप्टेंबर, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 सप्टेंबर, मराठवाड्यात 6 ते 8, तर विदर्भात 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या दिल्ली मुख्यालयाने मंगळवारी वर्तविला आहे.

असे आहेत अलर्ट

कोकण : 6 ते 11 सप्टेंबर
मध्य महाराष्ट्र : 6 ते 8 सप्टेंबर
मराठवाडा : 6 ते 8 सप्टेंबर
विदर्भ : 6 ते 9 सप्टेंबर

हेही वाचा

Shia Muslims in Pakistan | पाकमधील शिया मुस्लिमांना भारतामध्ये यायचेय!

Dengue Patient : राज्यात मलेरियाचे रुग्ण कमी; डेंग्यू, चिकुनगुनियाचा ‘ताप’

‘सुपरस्पेशालिटी’ला मान्यतेबाबत कार्यवाही करा

Back to top button