पंकजा मुंडे यांची यात्रा त्र्यंबकेश्वराच्या दारी | पुढारी

पंकजा मुंडे यांची यात्रा त्र्यंबकेश्वराच्या दारी

पुढारी : ऑनलाइन डेस्क 

भाजप नेत्या पंकजा मुंडे या पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी राज्यभर ‘शिवशक्ती परिक्रमा’ सुरु केली आहे. या परिक्रमेच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील शक्तिस्थळे व शक्तिपीठांचे दर्शन घेत आहेत. मुंडे यांच्या यात्रेने काल नाशिक येथे प्रवेश केला असून आज (दि.5) त्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले व तिथे पूजा केली आहे.

आज त्यांच्या परिक्रमेचा दुसरा दिवस असून त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन त्यांनी आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे. दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागत कार्यकर्त्यांकडून होत आहे. मध्यंतरी त्यांनी राजकारणापासून दोन महिन्यांची रजा घेतली होती. मात्र, शिवशक्ती परिक्रमा सुरु करुन त्या पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. त्र्यंकेश्वराचे दर्शन त्यांनी घेतले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्या भिमाशंकरकडे रवाना होणार आहेत.

Back to top button