Pune Ed Raids : पुण्यात पुन्हा ईडीचे छापे; 18.54 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त | पुढारी

Pune Ed Raids : पुण्यात पुन्हा ईडीचे छापे; 18.54 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने पुणे आणि अहमदनगरमधील ‘व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल एफिलिएट बिझनेस’ च्या संस्थांवर 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री छापे टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईत 18.54 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

छापेमारीची कारवाई दोन दिवस चालल्यानंतर ईडीचे पथक मुंबईला परतले असल्याचे समजते. वेंकटेश्वरा हॅचरीजवर कारवाई ईडी ने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा), 1999 च्या तरतुदी अंतर्गत मेसर्स वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड च्या 65.53 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 9 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या संबंधीची माहिती ईडी ने त्यांच्या वेबसाईटवर देखील जारी केली आहे.

हेही वाचा

मराठा आरक्षण संविधानिक दृष्टीने द्यायला हवे : पंकजा मुंडे यांचे सूतोवाच

आंतरराष्ट्रीय व्यापारात दक्षता गरजेची

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र लवकरच

Back to top button