मराठा आंदोलन पडसाद : भवानीनगर मध्ये मराठा समाजाचा मोर्चा | पुढारी

मराठा आंदोलन पडसाद : भवानीनगर मध्ये मराठा समाजाचा मोर्चा

भवानीनगर:पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर हल्ला झाल्या प्रकरणी भवानीनगर(ता.इंदापूर) येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे युवा आघाडीचे अध्यक्ष अमरसिंह कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विजय शिरसाट, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, हेमंत निंबाळकर, डी. एस. पवार आदींनी मनोगते व्यक्त केली.

भवानीनगर मधील गणपती मंदिरापासून व्यापार पेठेतून श्री छत्रपती कारखान्याच्या कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पुतळ्यापासून पुन्हा गणपती मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा गणपती मंदिराजवळ आल्यानंतर या ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी व्यापार पेठ बंद ठेवून आंदोलनाला सहकार्य केले. आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी जय जिजाऊ जय शिवराय गृहमंत्री फडणवीस यांचा निषेध राज्य सरकारचा निषेध अशी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

हेही वाचा :

उणीव डावखुर्‍या जलदगती गोलंदाजांविरुद्ध सरावाची

पुणे : परवाना न मिळाल्याने यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत 15 रुग्ण

Back to top button