पुणे : पालिका करणार होर्डिंगची तपासणी | पुढारी

पुणे : पालिका करणार होर्डिंगची तपासणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने परवानगी दिल्यानंतर संबंधित होर्डिंग कशाप्रकारे उभी केली जातात, याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नियमांना डावलून अधिकृत होर्डिंग उभे केली जात असल्याचे दै. ‘पुढारी’ने उजेडात आणले. याबाबत दिलेल्या वृत्तानंतर जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील होर्डिंगची तपासणी करण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या 2022 पासून नवीन नियमावलीनुसार शहरात होर्डिंग उभारण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून परवानगी दिली जाते.

होर्डिंगची उंची, दोन होर्डिंगमधील अंतर, लोखंडी सांगड्याची मजबुती, जाहिरातीचा रंग, प्रतिबंधित ठिकाणे यासह इतर नियमांचा यात उल्लेख आहे. शहरात अधिकृत होर्डिंगची संख्या 2 हजार 348 असून, त्यामधून महापालिकेला सुमारे 29 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंगला मान्यता देण्यात आली पण तेथे नियमांचे उल्लंघन करण्यात आले.

होर्डिंग उभारताना महापालिकेच्या कर्मचारी, अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पण या निमित्ताने शहरात चुकीच्या पद्धतीने उभारलेले होर्डिंग प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने नवीन नियमावली आल्यानंतर ज्या ठिकाणी होर्डिंगला परवानगी दिली आहे, तेथे प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्याची घोषणा केली आहे.

महापालिकेने शासनाच्या नवीन नियमावलीनुसार अनेक होर्डिंगला परवानगी दिली आहे. नियमावलीनुसार हे होर्डिंग उभारले आहेत की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण शहरात तपासणी मोहीम राबवून चुकीच्या पद्धतीने उभारलेल्या होर्डिंगसह दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई केली जाईल.

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त.

हेही वाचा

ठाणे : आधी पत्नीवर गोळ्या झाडून संपवलं, नंतर पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू

धुळे : लोडशेडिंग संदर्भात पिंपळनेरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

मिसिसिपीतील सर्वात लांब मगर

Back to top button