Pune News : लेकीच्या सायकल राईडसाठी पोलिस बाप भिजतोय पावसात | पुढारी

Pune News : लेकीच्या सायकल राईडसाठी पोलिस बाप भिजतोय पावसात

समीर सय्यद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसापासून ओढ दिलेल्या पावसाने शनिवारी सकाळीच हजेरी लावली आणि चालण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची एकच दैना झाली. हिंगणे परिसरात कॅनॉल रस्त्यालगत असलेल्या जॉगिंग ट्रॅक वर चालायला येणाऱ्यांची ही त्रेधातिरपीटी उडाली.

पण या पावसात ट्रॅकवर एका बाप-लेकीच्या अनोख्या प्रेमाचे दर्शनही झाले. फरासखाना पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग (डीबी पथक) मध्ये कार्यरत असलेले समीर माळवदकर हे साप्ताहिक सुटी असल्याने त्यांची चिमुकली शियाला सायकल राईड करण्यासाठी ट्रक वर घेऊन आले होते. पण अचानक पाऊस सुरू झाला आणि छत्री एकच. मग या पोलीस बापाने स्वतः पावसात भिजून लेकीच्या डोक्यावर छत्रीचे छत्र धरले. तर दुसऱ्या हाताने ते सायकलचा तोलही सांभाळत होते.

त्यांच्या या कसरतीमधून सर्वसामान्यांचे रात्रंदिवस रक्षण करणाऱ्या पोलीस बंधावामधील एक सहृदय बापाचेही दर्शन झाले. पोलिसांना त्यांच्या ड्युटीमुळे स्वतःसाठी वेळ मिळत नाही. परंतु साप्ताहिक सुटी आहे म्हणून मुलीला सायकल राईड साठी घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Jalgaon Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग

कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

Back to top button