Maratha Morcha protest : जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मराठा मोर्चाचे पुण्यात आंदोलन | पुढारी

Maratha Morcha protest : जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मराठा मोर्चाचे पुण्यात आंदोलन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलक जखमी झाले. याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुणेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी दिली. जालना येथील घटनेचा शुक्रवारी मराठा समाजातील विविध संघटनांनी निषेध नोंदविला.

सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजातील संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा समाजातील नागरिक शनिवारी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. गायकवाड आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसीमधूनच आरक्षण देणे आवश्यक असून, त्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. याच मागणीसाठी आंदोलन होते. आंदोलन दडपण्यासाठी लाठीचार्ज झाला, ही चुकीची घटना असून पोलिस आणि सरकारचा निषेध करतो, असेही कुंजीर यांनी सांगितले. शिवसंग्रामचे तुषार काकडे, मराठा महासंघाचे गणेश मापारी, अनिल ताडगे, पूजा झोळे, मयूर गुजर, विराज तावरे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ मुनगंटीवार यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही : कावरखे

Pune Solapur Fire : पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांना भीषण आग

Back to top button