Prithviraj Chavan : मोदी सरकार घाबरलेल्या अवस्थेत; पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र | पुढारी

Prithviraj Chavan : मोदी सरकार घाबरलेल्या अवस्थेत; पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

मुंबई: ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार दहशतीच्या सावटाखाली आहे. सरकार आता घाबरलेल्या अवस्थेत आहे. जनतेचे लक्ष वळवण्यासाठी अशा गोष्टी केल्या जात आहेत, अशा निशाणा चव्हाण यांनी सरकारवर साधला आहे. (Prithviraj Chavan)

संसदेच्या विशेष अधिवेशनावर आणि अधिवेशनाच्या अजेंड्यावरील चव्हाण म्हणाले की, अधिवेशन बोलावणे हे सरकारने घेतलेल्या निर्णयांचा एक भाग आहे. गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान हे विशेष अधिवेशन बोलवण्याची काय गरज आहे? सरकार हिंदूंच्या भावनांबाबत अनभिज्ञ आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे.

वन नेशन वन इलेक्शनवर ते म्हणाले की, सरकारला कधीही निवडणुका घेण्याचा अधिकार आहे. जर त्यांना लोकसभा निवडणुका लवकर घ्यायच्या असतील, तर ते लवकर घेऊ शकतात.

हेही वाचा 

Back to top button