पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार! आता लक्ष ‘कालवा समिती’च्या बैठकीकडे | पुढारी

पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार! आता लक्ष ‘कालवा समिती’च्या बैठकीकडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने पिके जळू लागली आहेत. पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास खडकवासला धरणातील पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी राखून ठेवावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 2 सप्टेंबरला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या कालवा समितीच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार, याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे पाटबंधारे प्रशासनाने पानशेत आणि वरसगाव धरण शंभर टक्के भरल्यानंतर पाणी सोडण्याची घोषणा केली;

परंतु खडकवासला धरणातून कालव्याद्वारे शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडल्यानंतर पानशेत धरणातून आलेले पाणी खडकवासला धरणातच अडविण्यात आले. आजमितीला खडकवासला धरणसाखळीतील पानशेत आणि वरसगाव ही मोठी धरणे पूर्ण भरली असून, टेमघर आणि खडकवासला धरणांमध्ये शंभर टक्के साठा झालेला नाही. चारही धरणांमध्ये मिळून 27.60 टीएमसी पाणीसाठा आहे. बैठकीमध्ये उर्वरित काळात होणारा पाऊस, शहर आणि जिल्ह्यातील पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्याची गरज, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास करावे लागणारे नियोजन यावर गंभीर चर्चा होऊन निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे यांनी जीवन संपवल्‍याने खळबळ

ग्राहकांचे पैसे बुडवणार्‍या पुण्यातील बिल्डरांना दणका

Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक

Back to top button