पिंपरी : महापालिकेकडून पत्रव्यवहार करताना शिवकालीन मंगल चिन्हाचा वापर | पुढारी

पिंपरी : महापालिकेकडून पत्रव्यवहार करताना शिवकालीन मंगल चिन्हाचा वापर

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पत्रांवर आता मस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवफ या बोधचिन्हाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि शौर्य अधोरेखित करणार्‍या मंगल चिन्हाचा वापर करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शासनाकडून शिवकालीन मंगल चिन्हें आणि महाराजाचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणार्‍या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर मराठी मनामनात व्हावा. जगभरात जेथे मराठी माणूस आहे, तेथे या माध्यमातून महाराजांचे विचार तसेच, त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी, हा या मागील उद्देश आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांच्या पत्रव्यवहारात या मंगलचिन्हाचा वापर करण्यात सुरूवात करण्यात आली आहे.

तसेच, राज्यातील सर्व शासकीय संस्था, स्थानिक स्वराज संस्था यांनी या मंगल चिन्हाचा वापर करण्यास राज्य शासनाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या विविध विभागाच्या पत्रावर तसेच, लेटरहेडवर हे मंगलचिन्ह छापलेले दृष्टीस पडत आहे. एका बाजूला महापालिकेचे बोधचिन्ह व दुसर्‍या बाजूला हे मंगलचिन्ह आहे. या मंगलचिन्हाचा वापर 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे. अद्याप सर्व विभागांनी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केलेली नाही.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू

शासकीय पत्रव्यवहार करताना शिवकालीन मंगल चिन्हाचा वापर करण्याबाबत राज्य शासनाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेस कळविण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या बोधचिन्हाचा वापर करण्यात येत आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

अहमदनगर : शिक्षण परिषदेच्या वेळेत अखेर बदल

पुतिन नव्‍हे, रशियाचे परराष्‍ट्र मंत्री होणार्‍या भारतात होणार्‍या G-20 परिषदेत सहभागी

नांदेडकरांच्या घशाला कोरड ; नागरिक पाणीटंचाईने हैराण

Back to top button