अहमदनगर : शिक्षण परिषदेच्या वेळेत अखेर बदल | पुढारी

अहमदनगर : शिक्षण परिषदेच्या वेळेत अखेर बदल

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण परिषदेच्या अयोग्य वेळेमुळे शाळा, प्रशिक्षण व कुटूंब यामध्ये महिला शिक्षिकांना अनंत अडचणीना सामोरे जावे लागते. यप्रश्नी आमदार नीलेश लंके यांनी लक्ष घातल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वेळेत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन दुपारी 2 ते 5 या वेळेत इतर जिल्हा परिषदांप्रमाणे ऑनलाईन शिक्षण परिषद आयोजीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन परिषद संगमनेर अंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वीच्या वर्गाना अध्यापन करणार्‍या शिक्षकांसाठी महिन्यातून एकदा शिक्षण परिषदेचे आयोजन सर्व केंद्र शाळांमध्ये केले जाते. परंतु शिक्षण परिषदांचे आयोजन करताना सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत शाळेमध्ये नियमित अध्यापन व दुपारी 1 ते 4 या वेळेत शिक्षण परिषदांचे आयोजन केले जाते.

शिक्षण परिषदेच्या दिवशी जवळजवळ 5 ते 6 हजार महिला शिक्षिकांना सकाळी 6 वाजता कुटुंबाबाहेर पडून संध्याकाळी 5 वाजता घरी यायला लागतात. अशावेळी शाळा, प्रशिक्षण व कुटूंब यामध्ये महिला शिक्षिकांना अनंत अडचणीना सामोरे जावे लागते. याबाबत पारनेर तालुक्यातील महिला शिक्षिकांनी शिक्षक परिषदेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची समक्ष भेट घेऊन निवेदन देऊन लक्ष वेधले होते.

आ. लंके यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना प्रत्यक्ष फोन, संपर्क करुन व निवेदन देऊन महिला शिक्षिकांना न्याय मिळवूण दयावा अशी आग्रही मागणी केली होती. आ.लंकेच्या निवेदनाची गांभिर्याने दखल घेत चाकणकर यांनी तातडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन दुपारी 2 ते 5 या वेळेत इतर जिल्हा परिषदांप्रमाणे ऑनलाईन शिक्षण परिषद आयोजीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

हेही वाचा

पारनेर : कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

कमजोर मान्सूनमुळे चिंतेचे ढग

पारनेर : प्रत्येक गावात विकासगंगा आणणार : आ. लंके

Back to top button