पुणे: नारायणगावमध्ये मोबाईल, दुचाकी चोरणारा गजाआड

पुणे: नारायणगावमध्ये मोबाईल, दुचाकी चोरणारा गजाआड
Published on
Updated on

नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: मोबाईल व दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे २ मोबाईल व ४ दुचाकी असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. पांडू बबन मुकने (वय ३५, रा. चास-नारोडी, ता. आंबेगाव) असे अटक करणात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

नारायणगाव पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी तसेच दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते. याबाबत योग्य तो तपास करण्याच्या पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी नारायणगाव पोलिसांना सुचना दिल्या होत्या. दरम्यान सहायक पोलिस निरिक्षक महादेव शेलार यांना नारायणगाव बाजारतळावर एकजण उभा असून त्याच्याकडे चोरीच्या ४ दुचाकी असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी पोलिस पथकास त्या ठिकाणी रवाना केले. पथकाने त्या संशयितास ताब्यात घेतले. त्याने तो पांडू मुकने असल्याची ओळख सांगितली. त्याच्याकडील दुचाकी चोरीच्या असल्याचे स्पष्ट झाले. तर २ चोरीचे मोबाईल देखील आढळून आले. दुचाकी नारायणगाव, ओतूर परिसरातून तर कोल्हेमळा येथून मोबाईल चोरल्याची त्याने कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, पोलिस उपनिरिक्षक विनोद धुर्वे, पोलिस हवालदार रमेश काठे, संतोष कोकणे, पोलिस नाईक मंगेश लोखंडे, पोलिस शिपाई शैलेश वाघमारे, संतोष साळुंके, दत्ता ढेंबरे, हासे, कोतकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार राजू मोमीन, अतुल डेरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिस हवालदार काठे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news