दुर्दैवी ! दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू | पुढारी

दुर्दैवी ! दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड येथील चिखली भागातील सचिन हार्डवेअरला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू  झाल्याचे समोर येत आहे. चिमणाराम चौधरी (वय 45) ,ज्ञानुदेवी चौधरी (वय 40) ,सचिन चौधरी (वय 10) ,भावेश चौधरी (वय 15) यांचा ह्या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. याच हार्डवेअर दुकानाच्या वरती चौधरी कुटुंब वास्तव्यास होते.

;

ही आग इतकी भीषण होती की यात जीव वाचवण्याची संधीही न मिळाल्याने चारही जणांचा होरपळून मृत्यू झाला. शॉटसर्किट मुळे ही आग लागली असल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा :

रक्षाबंधन विशेष : भावाने केले बहिणीच्या आयुष्याचे रक्षण; किडनीची ओवाळणी देत दिले नवे जीवन

Ethanol : कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉलनिर्मिती!

Back to top button