पुणे: तळेगाव स्टेशन पोस्ट कार्यालयात अर्थिक व्यवहार ठप्प | पुढारी

पुणे: तळेगाव स्टेशन पोस्ट कार्यालयात अर्थिक व्यवहार ठप्प

पुणे: तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील पोस्टकार्यालयामधील अर्थिक आवक-जावक व्यवहार गेले तीन-चार दिवसापासून ठप्प झाले आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या कालावधीत नागरिकांची अर्थिक गैरसोय होत आहे. या कार्यालयात तळेगावसह वराळे, माळवाडी, इंदोरी, आंबी आदी भागातील नागरिक खातेदार असुन त्यांचे या कार्यालयातील असलेले अर्थिक व्यवहार सध्या ठप्प झालेले आहेत. चौकशी केली असता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे अर्थिक आवक-जावक बंद असून कधी सुरु होईल ते सांगता येणार नाही, असे तेथील कर्मचाऱ्यांनी दै.पुढारी बरोबर बोलताना सांगितले. तरी पोस्टाच्या प्रशासनाने दखल घेवून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

तळेगाव स्टेशन भागातील पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची ऐन सणासुदीच्या काळात अर्थिक गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता याबाबत पोस्ट प्रशासन जबाबदार आहे. वरीष्ठांनी दखल घ्यावी.
– रवींद्र साबळे,सामाजिक कार्यकर्ते तळेगाव दाभाडे

हेही वाचा:

पुणे : लोहगाव-वाघोली रस्त्याचे काम निकृष्ट

पुणे : कसब्यात मानवी मनोर्‍यांचा उत्साह शिगेला ; युवकांसह युवतींच्याही पथकांच्या सरावाला वेग

पुणे : तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ चित्रीकरण

 

Back to top button