प्र-कुलगुरू काळकर यांची निवड रद्द करा ; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी | पुढारी

प्र-कुलगुरू काळकर यांची निवड रद्द करा ; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर काँग्रेसने आक्षेप घेतला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती होत असेल, तर हे अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी समाज माध्यमांवर स्पष्ट केले आहे. डॉ. काळकर यांच्या नियुक्तीनंतर दुसर्‍याच दिवशी वडेट्टीवार यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

त्यांनी याबाबत टि्वट करीत म्हटले आहे की, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे? ही नियुक्ती राजकीय दबावातूनच झाली असून, ती तत्काळ रद्द करण्यात यावी. प्र-कुलगुरुपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नियुक्तीने केवळ तत्काळ शैक्षणिक परिदृश्यावर परिणाम होणार नाही तर विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीवरही त्याचा परिणाम होणार आहे.

 हेही वाचा :

Jayakwadi Dam : मुळा-भंडारदर्‍यावर पुन्हा जायकवाडीची वक्रदृष्टी; नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याची नामुष्की

पुरंदर विमानतळ खासगीकरणातून !

Back to top button