पुणे विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांना मिळणार सीपीआरचे प्रशिक्षण | पुढारी

पुणे विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांना मिळणार सीपीआरचे प्रशिक्षण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम करणार्‍या सर्व शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी, सेवकांना सीपीआरचे (Cardio Pulmonary Resuscitation) शास्त्रीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हृदयविकारांच्या रुग्णाला तातडीने मदत होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी पडणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आरोग्य केंद्र आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने हृदयविकारांच्या रुग्णाला तातडीची मदत होण्यासाठी सीपीआरची शास्त्रीय माहिती सर्वांना करून देण्यासाठी पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित माहितीचा सर्वांना उपयोग होऊ शकतो. यामुळे विद्यापीठातील सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित प्रशिक्षण विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर हॉलमध्ये 22 ते 26 ऑगस्टदरम्यान पार पडणार आहे. दररोज दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत हे प्रशिक्षण दिले जाणार असून, दररोज 200 लोकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, साधारण दीड हजार कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Pune Metro : मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच

BRICS : ब्रिक्स हे विकासासह चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यापक व्यासपीठ; पीएम मोदी

Back to top button