अल्पवयीन मुलावर तरुणीचा धमकावून लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलावर तरुणीचा धमकावून लैंगिक अत्याचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलाला धमकी देऊन त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे 2021 ते नोव्हेंबर 2022 कालावधीत कोंढवा बुद्रुक परिसरात
घडली. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि तरुणी एकमेकांचे घराशेजारी राहत आहेत. पीडित मुलगा हा अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही, तरुणीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 'माझ्याशी शारीरिक संबंध ठेव नाहीतर, तू माझ्यावर बलात्कार केला, अशी खोटी तक्रार पोलिसांकडे देईन', अशी धमकी अल्पवयीनाला दिली होती.

त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने धमकावून त्याची इच्छा नसतानादेखील त्याच्याशी दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध ठेवले तसेच अल्पवयीन मुलाला मोबाईल कॅमेर्‍याद्वारे याचे चित्रीकरण करण्यास सांगितले. तरुणीच्या सततच्या धमक्यांमुळे अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. याबाबत तक्रारदार याने उशिराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने गुन्हा विलंबाने दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक एस. बाबर पुढील तपास करत आहेत.

पालकांना समजल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे

अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचे तरुणीने व्हिडीओ चित्रीकरण केले होते. हे व्हिडीओ मुलाच्या पालकांना दिसल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे या गैरकृत्याबाबत विचारणा केली. त्यावर त्याच्यावर जबरदस्ती झाल्याचा प्रकार यामध्ये उघड झाला. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news