पिंपरी : फेर, फुगडीने नागपंचमीचा आनंद द्विगुणित

पिंपरी : फेर, फुगडीने नागपंचमीचा आनंद द्विगुणित

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍याचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शहरातील महिलांनी नागपंचमी उत्साहात साजरी केली. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र आल्याने सर्व महादेव मंदिरातदेखील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महिलांनी या वेळी नागाच्या मूर्तीला दूध व लाह्या वाहिल्या. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून फुगडी, फेरी आणि गाणी यांचा मनसोक्त आनंद लुटला. काही ठिकाणी झोपाळ्याचा आनंद लुटत नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी शंकर आणि नागाचे पूजन करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे. या वेळी महिलांनी घरातच नागाच्या प्रतिमेचे तर काहींनी वारुळाचे पूजन केले. बाजारपेठेत नागाच्या आखीवरेखीव मूर्तीही उपलब्ध झाल्या आहेत. यंदाही महिलांना या प्रतिमांचे पूजन केले. सणानिमित्त घरोघरी पुरणाचे दिंड करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. नागपंचमीनिमित्त शहरातील मंदिरासमोर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नऊवारी, नथ, दागदागिन्यांचा साज घेतलेल्या महिलांचा उत्साह अर्वणीय होता.

चिंचवड शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात महिलांनी वारुळाची व नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने नागपंचमीनिमित्त महिलांसाठी पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांनी पारंपरिक खेळ व झोके खेळुन नागपंचमी सणाचा आनंद लुटला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news