पिंपरी : पोलिसांसाठी लोकसहभागातून 60 कोटी मिळवून देणार : पालकमंत्री | पुढारी

पिंपरी : पोलिसांसाठी लोकसहभागातून 60 कोटी मिळवून देणार : पालकमंत्री

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी- चिंचवड पोलिसांचे काम जलदगतीने होण्यासाठी त्यांनी शंभर कोटींची मागणी केली होती. यातील 40 कोटी नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. तर, उर्वरित 60 कोटी लोक सहभागातून मिळवून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पिंपरी-चिंचवडचे पोलस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. सोमवारी (दि. 21) पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चौबे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार आण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, विवेक खरवडकर, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.

आऊट ऑफ वे जाऊन काम करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रग्जचे प्रमाण वाढत आहे. ड्रग्ज तरुण मुला, मुलींना अक्षरशः खात आहेत. त्यामुळे ड्रग्जच्या कारवाई कोणतीही हयगय करू नका. वेळ पडली तर आऊट ऑफ वे जाऊन काम करा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिली.

आयुक्तांच्या पत्नीलाही बोलवायला हवे होते….

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची पत्नी सत्कार सोहळ्यासाठी यावी, यासाठी आयोजकांनी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, तसे प्रयत्न झाले नाहीत. यापुढे पोलिस आयुक्तांना पत्नीशिवाय कार्यक्रमाला येण्यासाठी परवानगी नाही, अशी प्रेमळ तंबी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयुक्तांना दिली.

हेही वाचा

कांदाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली आज बैठक

पिंपरी : फेर, फुगडीने नागपंचमीचा आनंद द्विगुणित

जगातील सर्वात महागडे नाणे!

Back to top button