पिंपरी : वर्गणीसाठी जबरदस्ती; तरुणांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : वर्गणीसाठी जबरदस्ती; तरुणांवर गुन्हा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कार्यक्रमासाठी वर्गणी दिली तर ठिक, नाहीतर दुकान उघडू देणार नाही. अशी धमकी देत, जबरदस्तीने वर्गणी घेणार्‍या तरुणांविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चौधरी पार्क, वाकड येथे 2 एप्रिलला घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी मोहमद वसिम नासिर राएन (28, रा. वाकड) यांचे बेकरीचे दुकान आहे. कार्यक्रमासाठी आरोपींनी वर्गणीची मागणी केली. वर्गणी दिली नाही तर, दुकान उघडू देणार नाही अशी धमकी, शिवीगाळ आणि दमदाटी करत साक्षिदार प्रकाश गुजर यांच्याकडून 500 रूपये तर फिर्यादीकडून 1100 रूपये असे एकूण 1600 रुपयांची खंडणी घेतल्याची फिर्याद वाकड पोलिसांत दिली आहे.

यामध्ये आरोपी विशाल वैजनाथ वाव्हळकर, विशाल अशोक शिंदे, सुरज शंकर वाघमारे (22), आकाश देविदास मनवर (27), निखील आप्पा सोनवणे (19), अमित नानासाहेब वाघमारे (27), किशोर राजू सुर्यवंशी (19) सर्व आरोपी राहणार वाकड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी सुरज, आकाश, निखील, अमित, किशोर यांना फौजदारी कायद्यानुसार नोटीस पाठविल्या आहेत.
कुठल्याही मंडळांना जबरदस्तीने नागरिकांकडून पैसे घेता येत नाही. याची जाणीव तरुणांनी ठेवावी,
अशी कृती करणे बेकादेशीर असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

पुणे : माजी नगरसेविकेला पेट्रोल कारचे बक्षीस

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र हिसकावले

अहमदनगर : गोंधळ, गदारोळ अन् धावाधाव ! गुरुजींचे तब्बल ६ तास चर्चेचे गुर्‍हाळ

Back to top button