पुणे : माजी नगरसेविकेला पेट्रोल कारचे बक्षीस | पुढारी

पुणे : माजी नगरसेविकेला पेट्रोल कारचे बक्षीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मिळकतकर वेळेत भरणार्‍या नागरिकांसाठी महापालिकेने आयोजित केलेल्या बक्षिस योजनेचा लकी ड्रॉमध्ये माजी नगरसेविकेसह पाच पुणेकरांना पेट्रोल कारचे बक्षीस मिळाले आहे. तर, 15 जणांना इलेक्ट्रिक स्कूटर, तर एकूण 45 भाग्यवंतांना लॅपटॉप, आयफोनसारखी बक्षिसे जाहीर झाली आहेत. चालू आर्थिक वर्षात मिळकतकर सवलतीच्या निर्णयामुळे मिळकतकरांचे बिलांचे वाटप उशिरा झाले होते. त्याचा थेट उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती असल्याने महापालिकेने दि. 2 ऑगस्टपर्यंत संपूर्ण मिळकतकर भरणार्‍या मिळकतधारकरांसाठी बक्षिस योजना ठेवली होती. त्याची सोडत रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली.

या वेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व विकास ढाकणे, तसेच उपायुक्त अजित देशमुख आदी उपस्थित होते. यात एक लाखाहून अधिक रकमेचा मिळकतकर भरलेल्यांच्या गटामध्ये बाणेर-बालेवाडीच्या भाजपच्या माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांना पेट्रोल कारचे बक्षीस जाहीर झाले. तर, एक लाखाहून अधिक रकमेचा मिळकतकर भरलेल्यांमध्ये नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ व एका साडीच्या दुकानाला इलेक्ट्रिक स्कूटरचे
बक्षीस मिळाले.

प्रमुख भाग्यवान विजेते पुढीलप्रमाणे

पेट्रोल कारचे विजेते
गट- वार्षिक कर 25 हजार रुपयांपर्यंतचा मिळकतकर
1) दीपाली व दर्शन ठाकूर
2) प्रियांका पोखरकर मुखेकर व निखिल मुखेकर

25 हजार ते 50 हजारांपर्यंत
1) माणिक ज्ञानोबा ढोणे

50 हजार ते एक लाखापर्यंत
1) आदित्य कुमार, मनिका राणी, अशोक कुमार व विनिता कुमार अगरवाल
एक लाख व त्याहून अधिक
1) गणेश ज्ञानोबा कळमकर व ज्योती गणेश कळमकर

हेही वाचा

Himachal Rain Alert :  हिमाचलमध्ये अतिवृष्टीचा इशारा  

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र हिसकावले

Back to top button