देहूगाव : दोन लाख वारकर्‍यांना अन्नदानाचा लाभ | पुढारी

देहूगाव : दोन लाख वारकर्‍यांना अन्नदानाचा लाभ

देहूगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अधिक मासानिमित्त देहूतील संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या वतीने 16 जुलै ते 16 ऑगस्ट असा एक महिना वारकर्‍यांसाठी मोफत अन्नदान महायज्ञाचे आयोजन केले होते. या काळात सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक वारकर्‍यांनी व भक्तांनी या महाअन्नदानाचा लाभ घेतला. या अन्नदान सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी भेट दिली. संत तुकाराम मंडळाचे अध्यक्ष आनंद काळोखे, माजी अध्यक्ष लक्ष्मण कंद, बाबा भालेकर, सदस्य संतोष शिंदे, संदीप शिंदे, उमेश टीजगे, प्रकाश भोसले,बबलू आत्तार, गणेश भालेकर, आबा भालेकर , चंद्रशेखर कंद, सुनील कंद, राजू बुचडे , प्रदीप काळोखे, रमेश भालेकर आदींनी हा महाअन्नदान यज्ञ पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

मंडळाने केला यांचा सन्मान

गेली महिनाभर अहोरात्र स्वयंपाक करणारे आचारी, त्यांचे मदतनीस कामगार, वाढपी अशा महिला पुरुष सेवकांना शाल श्रीफळ, एक पोशाख आणि संत तुकोबारायांची मूर्ती देऊन त्यांचा संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच, ध्वनिवर्धक, स्वच्छ पाणीपुरवठा करणारे, अन्य मदत करणार्‍या व्यक्तींचादेखील सन्मान करण्यात आला.

अन्नदानाची परंपरा मंडळाने सातत्याने ठेवली

संत तुकाराम महाराजांच्या या पुण्यभूमीत संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या माध्यमातून गेल्या एक महिन्यापासून, वारकर्‍यांना व भक्तांना अन्नदान केले जात आहे. ही अन्नदानाची परंपरा त्यांनी सातत्याने सुरू ठेवली आहे. हे अन्नदान मंडळ खरोखर पुण्याचे काम करीत आहेत.

– श्रीरंग बारणे, खासदार

हेही वाचा

वैतागलेले शिक्षक आंदोलनाच्या तयारीत

कियाराचा ग्लॅमरस लूक

नवी सांगवीतील बसस्थानकावर झाड पडल्याने नुकसान

Back to top button