पिंपरी : नागपंचमीनिमित्त बाजारपेठ सजली | पुढारी

पिंपरी : नागपंचमीनिमित्त बाजारपेठ सजली

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिन्यापासून मराठी सणांना सुरुवात होत असते. या महिन्यात सर्वात पहिला येणारा आणि आनंद देणारा नागपचंमी सण साजरा करण्यासाठी मुली, सुना, माहेरवाशीणी उत्सुक झाल्या आहेत. बाजारपेठा नव्या साड्या, दागिने, बांगड्या, मेंदी व विविध सौंदर्यप्रसाधनाने सजली आहेत.

हल्ली तरुणींसाठी नागपंचमी सणाचे फारसे महत्त्व राहिले नसले तरी नवविवाहीत तरुणी आणि विवाहीत महिला यांच्यासाठी नागपंचमी सणाची लगबग असते. शहरात वारूळे दुर्मिळ झालेली असल्याने महिलांसाठी नागाची प्रतिमा तयार करून पूजनाची सोय केली जाते. तसेच बाजारातदेखील नागाची प्रतिमा आणि मातीपासून तयार केलेल्या नागांच्या मूर्ती विक्रीस आलेल्या आहेत.

ग्रामीण भागात नागपंचमीनिमित्त उंच झोके घेण्यासाठी झोक्यांच्या बांधणीची लगबग असते. शहरातही उद्यानामध्ये महिलांसाठी झोक्याची व्यवस्था करण्यात येते. नागपंचमी म्हणजे मेंदी, नेलपॉलिश, बांगड्या आल्याच. महिलांच्या आवडीत झपाट्याने बदल होतात. दागिन्यांची फॅशन सहा महिन्यांत बदलते. नागपंचमी सणासाठी नवीन दागिन्यांचे स्टॉक आले आहेत. जुन्या फॅशनमध्ये नव्या रंगांची आणि नक्षीची मिश्रणे करून विविध प्रकारच्या नव्या साड्यांचे अनेक प्रकार यंदा उपलब्ध आहेत.

हेही वाचा

पत्नीच्या साडीने केला शेजाऱ्याचा घात; पतीने झाडली गोळी

पालघर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य हबीब शेख अटकेत

खडकेवाके ग्रामपंचायतीस ‘आयएसओ’ मानांकन

Back to top button