खडकेवाके ग्रामपंचायतीस ‘आयएसओ’ मानांकन

खडकेवाके ग्रामपंचायतीस ‘आयएसओ’ मानांकन

राहाता/एकरूखे; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सर्वांगीण वैशिष्ट्यपूर्ण विकास साधलेल्या आदर्शग्राम म्हणून ओळखल्या जाणार्‍या राहाता तालुक्यातील खडकेवाके ग्रामपंचायत कार्यालयाला जागतिक दर्जाचे आयएसओ 9001.2015 हे मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती खडकेवाके गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच संगीता मुरादे यांनी दिली.

आयएसओ मानांकन प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. सरपंच संगीता मुरादे यांनी सांगितले की, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील तसेच खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील या सर्वांचे खडकेवाके गावा करिता महत्त्वपूर्ण योगदान व मार्गदर्शन नेहमीच लाभत आहे. त्यामुळेच गाव सर्वांगीणदृष्ट्या विकासात्मक प्रगतीपथावर पोहोचत आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच जालिंदर मुरादे सर्व सदस्य व ग्रामस्थांचे गावच्या विकासासाठी विशेष सहकार्य तसेच पाठबळ असते. त्यामुळेच आदर्श, स्वच्छ, सुंदर, हरित, आरोग्यदायी गाव म्हणून खडकेवाके गाव उदयास येत आहे.

नागरिकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा उच्च दर्जाची सेवा देणे, ज्यामध्ये रस्ता, दिवाबत्ती, शिक्षण, आरोग्यसेवा तसेच दिले जाणारे दाखले व इतर मुलभूत सुविधा, शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी व त्या योजनांची अंमलबजावणी व्हावी, हे आयएसओ मानांकनाचे मुख्य उद्दिष्टे असतात.

ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 1 ते 33 नमुना व इतर रजिस्टर्स, फाईल, जुने रेकॉर्ड याचे अचूक व्यवस्थापन, ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचार्‍यांची आपल्या नागरिकांशी आदर युक्त वागणूक, हसतमुख व आपलेपणाची सेवा देणे. या प्रकारे निकष असतात हे निकष पूर्ण केल्यानेच अशा अनेक निकषांच्या जोरावर खडकेवाके ग्रामपंचायत कार्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त ठरलेले आहे.

देशाची प्रगती करायची असेल तर सुरुवात गावापासून करावी लागते, एक आदर्श गाव कसं असाव याच एक जीवंत उदाहरण म्हणजे राहाता तालुक्यातील खडकेवाके गाव. विखे परिवाराने जिरायत असणार्‍या या गावाला विकासाच्या दृष्टीने मोठे बळ दिले. भरीव निधी व शासनाच्या विविध योजना प्राधान्याने गावाला देऊन गावचा विकासात्मकदृष्ट्या कायापालट करत चेहरा मोहरा बदलला आहे. विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून व विकासाचे आदर्श ग्राम रोलमॉडेल म्हणून खडकेवाके गाव उदयास येत आहे.

– सचिन मुरादे, प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच खडकेवाके

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news