1 कोटी 17 लाखांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

1 कोटी 17 लाखांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ग्राहकांसाठी भारत व भारताबाहेर सेवा पुरविण्यासाठी 40 टक्के कमिशन देतो, असे सांगून 23 लाख 32 हजार रुपये आगाऊ घेऊन फिर्यादी यांनी केलेल्या कामाचे 1 कोटी 17 लाख 40 हजार न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनुप्रीत ओरसे कन्सल्टिंग कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुप्रीत ओरसे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत आदित्य कमलेश श्रीवास्तव (26, रा. विमाननगर, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार 14 एप्रिल 2022 ते ते 10 जानेवारी 2023 दरम्यान घडला. यापप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य श्रीवास्तव यांची मार्केट वेब जेन कंपनी आहे. कंपनी मार्केटींगची कामे करते. त्यांना अनुप्रित ओरसे याने फोन करून विचारले की, माझी गेल्या दहा वर्षापासून अनुप्रीत ओरसे कन्सल्टिंग नावाची कंपनी ग्राहकांसाठी भारत आणि भारताबाहेर लीड जनरेशन सर्व्हिसेससंबंधी सेवा पुरविते असे सांगितले.

तसेच ओरसे याने आमच्या कंपनीवर कामाचा व्याप जास्त असून, फिर्यादी यांच्या कंपनीला 40 टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखविले. तसेच 60 दिवसात केलेल्या कामाचे पैसे मिळतील, असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी तब्बल 23 लाख 32 हजार आगाऊ ओरसे याच्या कंपनीला दिले. मात्र कामाचे व दिलेले असे 1 कोटी 17 लाख न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा

मोठा उद्योग आणण्यासाठी एकत्र या : उद्योगमंत्री सामंत

पुणे : चव्हाणनगरला न सोडल्यास मारून टाकण्याची धमकी

दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश,कलबुर्गी हत्येत समान धागा आहे का?

Back to top button