दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश,कलबुर्गी हत्येत समान धागा आहे का?

supreme court
supreme court

नवी दिल्ली : अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम करणारे नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि अभ्यासक एम.एम कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये काही 'समान धागा' आहे का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला केली.

दाभोलकरांची कन्या मुक्ता दाभोलकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेतांना न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हा प्रश्न केला. मुक्ता यांनी आपल्या वडिलांच्या हत्येच्या तपासासंदर्भात 18 एप्रिल 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. या चार हत्यांमागे मोठा कट होता. उपलब्ध पुराव्यांवरून असे सूचित होते की ही प्रकरणे जोडली जाऊ शकतात आणि मुक्ता दाभोलकर यांनी हा मुद्दा उच्च न्यायालयासमोर मांडला होता, असा युक्तिवाद मुक्ता यांची बाजू मांडणारे वकील आनंद ग्रोव्हर यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news