Dr. Pradip Kurulkar : वेळ न पाळल्याने न्यायालयाने एटीएसला फटकारले

Dr. Pradip Kurulkar : वेळ न पाळल्याने न्यायालयाने एटीएसला फटकारले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डॉ. प्रदिप कुलुकर यांच्या जामीवरील व व्हॉईस लेअर सायकॉलॉजीकल अ‍ॅनालिटीकल टेस्टच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील हजर असताना देखील दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) कोणीही न्यायालयात वेळेत न्यायालयात हजर नसल्याने न्यायालयाने एटीएसला फटकारले. न्यायालयाने सरकारी वकीलांना त्यांना वेळेत हजर राहण्याबाबत सांगा, आम्ही आमच्या सुनावण्या थांबवून तुम्हाला वेळ देतो म्हणत राग व्यक्त केला.

दरम्यान एटीएसच्या तपास अधिकार्‍यांना पुन्हा पुकारा असे सांगण्यात आले. यावेळी एटीएस वेळेत हजर न झाल्याने पुढे आम्ही सांगेल तेव्हाच मग यावे लागेल असे म्हणत संताप व्यक्त केला. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान शुक्रवारी डॉ. प्रदिप कुरूलकरच्या सुनावणी दरम्यान तो व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे न्यायालयात हजर झाला.

काही वेळातच सुनावणी सुरू झाल्यानंतर एटीएसच्या तपास अधिकारीही न्यायालयात हजर झाल्या. मागील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ऋषिकेश गाणू यांनी जप्त केलेल्या मोबाईलच्या आयएमई नंबर देण्याची मागणी केली होती. त्या आयएमी नंबरचा गोंधळ एटीएसनी शुक्रवारी दुर करताना एका मोबाईला दोन सिमकार्डचे स्लॉट असल्याने त्या दोन्ही स्लॉटचे आयएमई नंबर वेगवेगळे असतात असे सांगताना.

गुजरात येथील फॉरेन्सिक लॅबला जो मोबाईल पाठवायचा आहे त्यांचा आयएमई नंबर दिला. बचाव पक्षाचे आयएमई नंबरबाबत समाधान झाल्यानंतर विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी जामीनावर म्हणणे सादर करण्यासाठी एटीएसच्या वतीने वेळ वाढवून मागितली. त्याला बचाव पक्षाचे वकील ऋषिकेश गानू यांनी विरोध करताना डॉ. कुरूलकर हा गेली मे महिन्यांपासून अटकेत आहे.

याप्रकरणात 7 जुलै रोजी आरोपपत्र दाखल झाले आहे. एटीएसला याप्रकरणात पुरेपुर वेळ मिळाला आहे असा युक्तीवाद केला. त्यावर एटीएसने मुंबई येथील कार्यालयातून याबाबत म्हणणे आल्यानंतर लवकरात लवकर म्हणणे सादर करू असे तपास अधिकारी सुजाता तानवडे यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने जामिनावरील सुनावणी तसेच व्हॉईस लेअर सायकॉलॉजिकल अ‍ॅनालिटिकल चाचणीवर पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजी ठेवली आहे.

कुरूलकरला त्याचा पत्नीचा मोबाईल पाठवत नसल्याची माहिती :

पत्नीचा मोबाईलशी गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आल्यानंतर त्यांचे वकील अ‍ॅड. गानू यांनी कुरूलकर याला त्यांनी तुमच्या पत्नीचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवत नसल्याची माहिती दिली. दरम्यान सुनावणी सुरू झाली तेव्हा कुरूलकरने व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे न्यायाधीशांशी संवाद साधत आपले म्हणणे मांडले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news