शिवाजीनगरहून-नाशिकसाठी ई-शिवाईच्या नव्या 18 बस | पुढारी

शिवाजीनगरहून-नाशिकसाठी ई-शिवाईच्या नव्या 18 बस

पुणे : एसटीच्या शिवाजीनगर आगारातून नाशिकसाठी 9 नवीन ई-शिवाई सोडण्यात आल्या आहेत. तर, नाशिकवरून सुद्धा शिवाजीनगरसाठी 9 नव्या ई-शिवाई बस सोडण्यात आल्या आहेत. अशा एकूण 18 नव्या इलेक्ट्रिक शिवाई बस पुणे-नाशिक मार्गावर धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुणेकर आणि नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे, अशी विभाग नियंत्रक कैलास पाटील आणि शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली.

कोल्हापूरलाही 12 बस सोडणार
एसटीकडून नाशिकसह कोल्हापूर-स्वारगेट मार्गावरसुध्दा बस सोडण्यात येत आहेत. स्वारगेट आणि कोल्हापूर आगाराच्या मिळून एकूण 12 ई-शिवाई बस सोडण्यात येणार आहेत.

..असा आहे तिकीट दर
शिवाईचा तिकीट दर शिवशाहीप्रमाणेच
नाशिकसाठी : 475 रुपये तिकीट
पुणे-कोल्हापूर : 500 रुपये तिकीट

पुणे-नाशिक मार्गावरील
इतर बससेवा
जनशिवनेरी : 20
शिवशाही : 14
ई-शिवाई :18 (नवीन सुरू)

हेही वाचा :

ICC World Cup 2023 : विश्वचषकाची वर्ल्ड टूर अन् वाह ताज!

मोफत वैद्यकीय तपासणीचा सीपीआरला लाभ नाही

Back to top button