पुणेकरांनो Good news !! रूबी हॉल-रामवाडी मार्ग नोव्हेंबरमध्ये सुरू होणार

पुणेकरांनो Good news !! रूबी हॉल-रामवाडी मार्ग नोव्हेंबरमध्ये सुरू होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  तिसर्‍या टप्प्यातील रुबी हॉल ते रामवाडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचे काम येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून, आगामी तीन महिन्यांतच मेट्रोचा तिसरा टप्पा प्रवासासाठी खुला होणार आहे. म्हणजेच पुणेकरांना वनाज ते रामवाडी या
संपूर्ण मार्गावर आता प्रवास करता येणार असून, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या चौथ्या टप्प्यावर मेट्रोने प्रवास करण्यासाठी जानेवारी 2024 उजाडणार आहे. महामेट्रोच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच झाले आहे.

त्यानंतर हे मेट्रो मार्ग आता प्रवासासाठी खुलेदेखील झाले आहेत, त्यामुळे पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुणेकर तिसरा आणि चौथा टप्पा कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत आहेत. हे टप्पे खुले झाल्यावर प्रवाशांना फायदा होणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने हे उर्वरित दोन्ही टप्पे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे

पहिला टप्पा…

(उद्घाटन दि. : 6 मार्च 2023)
वनाज ते गरवारे कॉलेज : 5 किलोमीटर
स्थानके : वनाज, आनंदनगर,
आयडीयल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज

पीसीएमसी ते फुगेवाडी : 7 किलोमीटर
स्थानके : पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी

दुसरा टप्पा..

(उद्घाटन दि. : 1 ऑगस्ट 2023)
गरवारे कॉलेज ते रुबी हॉल स्टेशन : 4.7 किलोमीटर
स्थानके : डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट,
मंगळवार पेठ (आरटीओ), रुबी हॉल क्लिनिक स्टेशन

फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट : 6.9 किलोमीटर
स्थानके : फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट

तिसरा टप्पा…

(नोव्हेंबर 2023 मध्ये होणार)
रुबी हॉल ते रामवाडी : 06 किलोमीटर
स्थानके : बंडगार्डन, येरवडा,
कल्याणीनगर, रामवाडी

चौथा टप्पा…

(जानेवारी/ फेब्रुवारी 2024
मध्ये होणार)
सिव्हिल कोर्ट ते
स्वारगेट : 5 कि.मी.
स्थानके : बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट

पहिला आणि दुसरा टप्पा नुकताच पुणेकर प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. आता पुणे स्टेशन ते रामवाडी हा तिसरा टप्पा नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. चौथा टप्पा सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट जानेवारी 2024 पर्यंत सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यादृष्टीने सर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
                                      – हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news