संशयित बेवारस बॅग सापडल्याने पुणे रेल्वे स्थानकावर उडाला गोंधळ; आरपीएफ, जीआरपीसह पोलिसांकडून मॉकड्रील | पुढारी

संशयित बेवारस बॅग सापडल्याने पुणे रेल्वे स्थानकावर उडाला गोंधळ; आरपीएफ, जीआरपीसह पोलिसांकडून मॉकड्रील

पुणे, पुढारी वृतसेवा: दुपारी बारा वाजले असतील, इतक्यात नियंत्रण कक्षाचा फोन खणाणला, समोरून एका व्यक्तीने पुणे रेल्वे स्थानकावर संशयित बेवारस बॅग सापडल्याचे सांगितले. हे ऐकताच इतर यंत्रणांना हाय अलर्ट गेला आणि पुणे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. मात्र, थोड्या वेळानंतर हे एक मॉकड्रील असल्याचे समजताच प्रवाशांच्या जीवात जीव आला.

सध्या पुणे रेल्वे स्थानक हाय अलर्टवर आहे. त्या पार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनासह संबंधित यंत्रणांनी सोमवारी (दि. 14) रोजी पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. वेळप्रसंगी प्रवाशांना कशाप्रकारे तात्काळ मदत मिळेल, याची माहिती घेतली. या मॉकड्रीलमध्ये रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस, पुणे शहर पोलिस, बंडगार्डन पोलिस स्टेशन यांसह अनेक सबंधित यंत्रणांनी सहभाग घेतला होता.

मॉकड्रील दरम्यान उपस्थित राहून स्टेशन डायरेक्टर मदनलाल मीना, लोहमार्ग पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक बी.एस. रघुवंशी यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी स्थानकावर परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच डॉग स्कॉड, बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक) पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ या बॅगेची तपासणी करून, ते नष्ट करण्याचे नियोजन केले. त्यावेळी अग्निशामक दलासह सर्व यंत्रणा घटना स्थळी दाखल झाल्या होत्या.

हेही वाचा:

गंगाखेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; भिसे, जाधव या युवा नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाणे : कळवा रुग्णालयात आणखी ४ रूग्णांचा मृत्यू; मृतांमध्ये एक महिन्याच्या बालकाचा समावेश

हिंगोली : वसमतमध्ये गाढव मोर्चा; घरकुल योजनेसंबंधी भीमशक्तीने मांडले प्रश्न

 

 

Back to top button