ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कळवा रुग्णालयात मागील २४ तासात १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज आणखी ४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी रात्री ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला असताना. आज पुन्हा ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती दिली गेली आहे. मृतांमधील एक रुग्ण मृत अवस्थेत आणण्यात आला होता, अशी माहिती डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. तसेच एका रुग्णावर उपचार सुरू होते तर एक आयसीयूमधील रुग्णाचा समावेश आहे.
हेही वाचा :