टोमॅटोपाठोपाठ आता कांदा खातोय भाव?

टोमॅटोपाठोपाठ आता कांदा खातोय भाव?
Published on
Updated on

चाकण(पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची मोठी आवक झाली. कांद्याची आवक वाढूनही भाव कडाडले. मेथीची आवक घटली; तर कोथिंबीर, शेपू व पालकभाजीची उच्चांकी आवक झाली. लसणाची आवक व भावही स्थिरच राहिले. जनावरांच्या बाजारात जर्सी गायी व म्हैस यांच्या संख्येत घट झाली. तर बैल व शेळ्या-मेंढ्या यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल 3 कोटी 40 लाख रुपये झाली.

कांद्याची एकूण आवक 1,100 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 350 क्विंटलने वाढूनही भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1,500 रुपयांवरून 2,500 रुपयांवर पोहचला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 250 क्विंटलने घटून बटाट्याचा कमाल भाव 2,000 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरच स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 425 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून ते 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक 1,100 क्विंटल. भाव क्रमांक 1 : 2,500 रुपये, भाव क्रमांक 2 : 1,800 रुपये, भाव क्रमांक 3 : 1,000 रुपये.
बटाटा : एकूण आवक 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1 : 2,000 रुपये, भाव क्रमांक 2 : 1,600 रुपये, भाव क्रमांक 3 : 1,200 रुपये.
फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे :
टोमॅटो : 170 क्विंटल (5,000 ते 8,000 रुपये), कोबी – 208 क्विंटल (1,000 ते 2,000), फ्लॉवर – 216 क्विंटल (1,000 ते 2,000), वांगी – 94 क्विंटल (2,000 ते 3,000), भेंडी – 90 क्विंटल (2,000 ते 3,000), दोडका – 63 क्विंटल (3,500 ते 4,500), कारली – 75 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा – 69 क्विंटल (1,500 ते 2,500), काकडी – 74 क्विंटल (1,000 ते 2,000), फरशी – 36 क्विंटल (4,000 ते 6,000), वालवड – 69 क्विंटल (3,500 ते 5,500), गवार – 60 क्विंटल (5,000 ते 7,500), ढोबळी मिरची – 175 क्विंटल (4,000 ते 6,000), चवळी – 39 क्विंटल (2,500 ते 3,500), वाटाणा – 82 क्विंटल (5,000 ते 6,000), शेवगा – 52 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 130 क्विंटल ( 2,000 ते 2,500).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 29 हजार 560 जुड्या (400 ते 600 रुपये), कोथिंबीर : एकूण 46 हजार 500 जुड्या (100 ते 400 रुपये), शेपू : एकूण 4 हजार, 900 जुड्या (500 ते 800 रुपये), पालक : एकूण 4 हजार 600 जुड्या (500 ते 700 रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 35 जर्सी गायींपैकी 27 गायींची विक्री झाली (20,000 ते 50,000 रुपये), 110 बैलांपैकी 90 बैलांची विक्री झाली (15,000 ते 30,000 रुपये), 120 म्हशींपैकी 110 म्हशींची विक्री झाली (30,000 ते 80,000 रुपये), 7,350 शेळ्या-मेंढ्यापैकी 7,200 शेळ्यांची विक्री झाली (2,000 ते 25,000 रुपये).

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news