साखर, डाळी, कडधान्ये, बेसन दरात वाढ; गावरान ज्वारी दरात घट

साखर, डाळी, कडधान्ये, बेसन दरात वाढ; गावरान ज्वारी दरात घट
Published on
Updated on

पुणे : मागणी वाढल्याने साखरेची दरवाढ सुरूच असून, गेल्या आठवडयात दरात क्विंटलमागे आणखी पन्नास रुपयांनी वाढ झाली. तूरडाळ, हरभराडाळ, उडीदडाळ हिरवा वाटाणा, काबुली चणा या जिनसांचे दरही आणखी वधारले. हरभराडाळीचे दर वाढल्यामुळे बेसन शंभर रुपयांनी तर आटा, रवा आणि मैदाही पन्नास रुपयांनी महागले. मात्र, उंच दरात मागणी कमी असल्यामुळे गावरान ज्वारी दरात काही प्रमाणात घट झाल्याचे सांगण्यात आले.

आगामी सणासुदींचा कालावधी लक्षात घेता सध्या बाजारात साखरेला मागणी वाढत असून दरवाढ सुरुच आहे. गेल्या आठवडयातही साखरेच्या दरातही क्विंटलमागे आणखी पन्नास रुपयांनी वाढ झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3850 ते 3875 रुपये होता. सध्या गुळास मागणी कमी असून आवकही बेताचीच आहे, यामुळे गेल्या काही दिवसांपासून भावात फारशी वध घट झालेली नाही. गेल्या आठवडयातही गुळाचव्या दरात कोणताही फेरबदल आढळला नाही.

डाळी आणखी महागल्या

मागणी चांगली असून उत्पादन केंद्रातील तेजीचे वृत्त आण मंदावलेली आवक यामुळे गेर्ल्या आठवडयातही बहुतांशी डाळी-कडधान्यांचे दर आणखी वाढल्याचे पहावयास मिळाले. गेल्या आठवडयात तुरडाळ, हरभराडाळ, उडीदडाळीच्या दरात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली. काबुली चणा आणि हिरव्या वाटाण्याची दरवाढ सुरुच असून गेल्या आठवडयातही दरात आणखी पाचशे रुपयांनी वाढ झाली. भाजक्या डाळयाचे दरही 40 किलोमागे शंभर रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले.

मिलबर गव्हाचे दर वाढल्यामुळे तसेच मागणी चांगली असल्याने रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे आणखी 50 रुपयांनी वाढ झाली. मात्र उंच दरात मागणी कमी झाल्याने गावरान ज्वारीची दरवाढ थांबली असून दरात काही प्रमाणात घट झाल्याचे सांगण्यात आले. तर आवक जावक साधारण असल्यामुळे गहू, बाजरी तसेच सर्व प्रकारच्या तांदळाचे दर स्थिर होते.
अद्यापही खाद्यतेलांस मागणी कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीच्या वृत्तामुळे आणि उठाव कमी असल्यामुळे सर्व प्रकारच्या खाद्यतेलांचे दर गेल्या आठवड्यातही सर्वसाधारपणपणे स्थिर होते.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3850 ते 3875 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर): शेंगदाणा तेल 2800-2900, रिफाईंड तेलः 2550-3250, सरकी तेल 1510-1800, सोयाबीन तेल 1500-1700, पामतेल 1400-1600, सूर्यफूल रिफाईंड तेल 1500-1700, वनस्पती तूप 1530-2000, खोबरेल तेल 2150-2200 रु. तांदूळ – गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3500, सोनामसूरी 4000-4500, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 8000-8500, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर 2750 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दूरी 3800-4200 रु. बाजरी : महिको 3200-3500, गावरान 3000-3200, हायब्रीड 2800-3000 रु.
गूळ : गूळ एकस्ट्रा 4200-4400, गूळ नं. 1 4000-4150, गूळ नं. 2 3850-3950, गूळ नं.3 3700-3825 बॉक्स पॅकिंग 4000-5000 रु. डाळी : तूरडाळ 13000-14700, हरभराडाळ 6300-6600, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7000-7200, मटकीडाळ 9800-1000, उडीदडाळ 9000-11500 रु.
कडधान्ये : हरभरा 5500-5700, हुलगा-9000-10000 चवळी 7000-15000, मसूर 6500-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 8000-8200, मटकी गुजरात 8000-8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-12000, वाटाणा हिरवा 7500-8000, वाटाणा पांढरा 550-5700, काबुली चणा 12000-17000 रु.
साबूदाणा : साबुदाणा नं.1 8000, साबूदाणा नं.2 7500, साबूदाणा नं. 3 7200 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1000-1100 रु.
शेंगदाणा : जाडा 13200-13700, स्पॅनिश – 12500-13000 घुंगरु 12500 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल :2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4100-4600, पेण 3700-4100, मध्यम पोहा-3900-4100, दगडी पोहा 4000-4800, पातळ पोहा 4800-5400, सुपर पोहा 4600-4900, भाजका पोहा 575-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2950-3550, मुरमुरा (9 किलोस) 525-550, भडंग 850-900, घोटी 530, सुरती 550 रु.
रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1550-1600, रवा 1600-1700, मैदा 1600-1700, बेसन :- (50 किलोस) 3600-3900 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 250, मीठ दळलेले (50 किलोस) 270 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 5000-5500, लवंगी तेजा 25000-26000, गुंटूर 24000-25000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु.
नारळ : (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400-1450, सापसोल 2000-2500 रु.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news