पुणे, पुढारी ऑनलाईन: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरी ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलं आहे.
शरद पवार हे शनिवारी पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्कमध्ये व्यावसायिक चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे. शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीची बातमी माध्यमांना कळाल्यानंतर उद्योगपतीच्या बंगल्याबाहेर पत्रकार जमा झाले. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्यातून बाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार-अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका-पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा: