जेव्हा देहूतील मुख्य मंदिरात शिरतात अतिरेकी ! 

जेव्हा देहूतील मुख्य मंदिरात शिरतात अतिरेकी ! 
Published on
Updated on
देहूगाव : शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास देहूतील संत तुकाराम महाराज मंदिरातून पोलिसांना फोन येतो. त्यानंतर शहरातील पोलिस यंत्रणा सतर्क होते आणि मंदिराला पोलिसांचा वेढा पडतो. त्यामुळे नागरिकांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांची एकच पळापळ होते. मंदिरात तीन अतिरेकी शिरल्याची माहिती पोलिस दलाला असते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश येते. या थरारानंतर संपूर्ण शहर सुटकेचा निश्वास टाकते. परंतु, पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल केले असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मंदिराला पोलिसांचा वेढा 
देहूगावच्या मुख्य मंदिरात तीन अतिरेकी घुसले असून, एकजण नगार खाण्यात उभा राहून पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवत आहे. तर, अन्य दोन अतिरिक्यांनी सभा मंडळातील वारकरी-भाविकांना ओलीस ठेवले असल्याची बातमी देहूरोड पोलिस ठाण्याला सायंकाळी साडेचारच्या सुमारास समजली. त्यानंतर तत्काळ देहूरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिंगबर सूर्यवंशी व अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी देहूगावातील मुख्य मंदिराजवळ आले.
वाहनांची तपासणी 
मंदिराकडे जाणारी वाहने अडविण्यात आली होती. कोणत्याही माणसाला मंदिराकडे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला तर मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे गावात वातावरण खूपच भीतीदायक निर्माण झाले होते.  शेवटी शीघ्र कृती पथक सर्व तयारीनिशी मंदिरात घुसले आणि अतिरेक्यांच्या मुसक्या अलगद आवळल्या व अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या भाविकांची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी अतिरेकी पकडले असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. तीन अतिरेक्यांना पकडून पोलिस आयुक्तालयात घेऊन गेले. त्यानंतर देहूतील काही काळ विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्ववत झाले; परंतु हे मॉकड्रिल असल्याचे समजल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
बाँब शोध पथक दाखल 
अतिरेकी पळून जाऊ नये यासाठी त्यांनी संपूर्ण मंदिराला घेरले. ही खबर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयास मिळाली आणि पोलिस आयुक्त विनायक चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यात बाँब शोध पथक, श्वानपथक, दंगल नियंत्रण पथक तसेच शीघ्रकृती दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा ताफा, रुग्णवाहिका, पोलिस व्हॅन, अग्निशामक दलाचे दोन बंब सायरन वाजवत गावात आल्याने आणि मंदिरात अतिरेकी घुसले असल्याचे समजल्याने संपूर्ण देहूगावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देहू देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त यांना विश्वासात घेऊन केवळ पोलिस प्रशिक्षण म्हणून हा सराव केला आहे. हे मॉकड्रिल होते. 
                                                                                     – काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news