नीरा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरी चिंतेत | पुढारी

नीरा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरी चिंतेत

बावडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : निरा नदीचे पात्र सध्या ऐन पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात कोरडे पडल्याने शेतकरी वर्गातून काळजी व्यक्त केली जात आहे. परिणामी, नदीकाठच्या शेतातील उभ्या पिकांसाठी वीर धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने नीरा नदीवरील आनंदनगर, सराटी आदी ठिकाणचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे पडले. त्यामुळे बंधार्‍यांच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके धोक्यात आली आहे.

पावसाने ओढ दिल्याने शेतातील उभ्या पिकांना पावसाची गरज आहे व दुसर्‍या बाजूला नदीपात्रही कोरडे पडले आहे. सध्या वीर, भाटघर, निरा देवधर या धरणांमध्ये सुमारे 85 टक्के असा समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या चारा पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी मिलिंद पाटील (बावडा), अमर भोसले (सराटी), किरण पाटील (चाकाटी), दूधगंगा दूध संघाचे संचालक दयानंद गायकवाड (बोराटवाडी), राहुल कांबळे (खोरोची) यांनी केली आहे.

हेही वाचा

नगर : किराणा दुकान फोडून मुद्देमाल लंपास

पिसाच्या झुकत्या मनोर्‍याचा 850 वा ‘वाढदिवस’!

नगर : राजळेंमुळे वृद्धेश्वर कारखाना सुस्थितीत : नितीन पवार

Back to top button