

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहरातील नवीपेठ येथे पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवीण बेदमुथ्था यांच्या किराणा दुकानाचा छताचा पत्रा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील चार ते पाच हजार रुपये रोख रक्कम व सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. प्रवीण रमेशलाला बेदमुथ्था यांचे राहुरी शहरातील नवीपेठ परिसरात ज्ञानेश्वर थिएटर समोर किराणा दुकान आहे. प्रवीण बेदमुथ्था हे दिनांक 7 ऑगस्ट रोजी रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते.
दिनांक 8 ऑगस्ट रोजी पहाटे दिड वाजे दरम्यान एका अज्ञात तरूणाने प्रवीण बेदमुथ्था यांच्या दुकानच्या छतावरील पत्रा उचकटून त्याखाली असलेली लोखंडी जाळी वाकवून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर त्या भामट्याने सुमारे एक तास दुकानातील चालक व इतर सामानाची उचकापाचक केली. त्यावेळी त्याने दुकानातील 4 ते 5 हजार रुपये रोख रक्कम व सुमारे 40 हजार रुपयांचा सिगारेट व बिडीचा मुद्देमाल चोरून पसार झाला. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
हेही वाचा :