नगर : राजळेंमुळे वृद्धेश्वर कारखाना सुस्थितीत : नितीन पवार | पुढारी

नगर : राजळेंमुळे वृद्धेश्वर कारखाना सुस्थितीत : नितीन पवार

पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा :  सहकार महर्षी, अनेक दिग्गजांंनी सहकारी कारखाने योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे बंद पडले. सध्याच्या काळात साखर कारखानदारी चालणारी सोपी गोष्ट नाही. प्रतिकूल परिस्थितीत वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्या नेतृत्वाखाली सुस्थितीत सुरू आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय साखर कमागार संघाचे सरचिटणीस नितिन पवार यांनी केले. वृद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त आदिनाथनगर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्या पवार बोलत होते.

याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, दिनकर महाराज वरुरकर, राहुल राजळे, अभय आव्हाड, डॉ मृत्यूंजय गर्जे, विष्णूपंत अकोलकर, नारायण धस, चारुदत्त वाघ, रामकिसन काकडे, सुभाष बर्डे, माणिक खेडकर,बापूसाहेब पाटेकर, ताराभाऊ लोंढे, नंदकुमार शेळके, काकासाहेब शिंदे, सुभाष ताठे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, कारखाना चालवताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. कधी दुष्काळ,कधी पाऊस अशा दृष्ट चक्रातून कारखानदारी जाते. येथील कामगारांची जशी आपल्या कामावर निष्ठा आहे त्याच प्रकारची राजळे कुटुंबावरती निष्ठा आहे. त्यामुळेच कामगार संघ व्यवस्थापन व कारखाना व्यवस्थापन यात कधी संघर्ष पाहायला मिळाला नाही. अप्पासाहेब राजळेंप्रमाणेच आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे यांची साखर कारखानदारी विषयीची सकारात्मकता कामगार, शेतकर्‍यांना न्याय देऊन कारखानदारीचा गाडा पुढे घेऊन जाण्यासाठीचा चांगला प्रयत्न सुरू आहे.

दिनकर महाराज वरुरकर म्हणाले, अप्पासाहेब राजळे यांनी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, कारखान्याचे अध्यक्ष अशा विविध पदांवर जाऊन सुद्धा त्यांना कधी गर्व आला नाही. कायम संयमी स्वभाव त्यांनी अंगिकारला. सत्ता आली की माणूस त्या धुंदीत वावरतो ती सत्ता काही काळाकरता आपल्याकडे असते, हा माणसाला विसर पडून सत्तेच्या गुरमीत असतो. मात्र, राजळे यांनी सत्ता असो किंवा नसो कायम शांतताप्रिय व संयमी भूमिका बजावली.

याप्रसंगी बंडू बोरुडे,सुनील ओव्हळ, महेश बोरुडे, जगदीश काळे, बबन बुचकुल, जमीर आतार, श्रीकांत मिसाळ, शेषराव कचरे, नामदेव लबडे, शिवाजी मोहिते, काशीबाई गोल्हार, मंगल कोकाटे, सिंधू साठे उपस्थित होते.प्रास्तविक जे. आर. पवार, सूत्रसंचालन आर. बी. शेख यांनी केले. रामकिसन काकडे यांनी आभार मानले.

हेही वाचा :

सांगली : ऑनलाईन फसवणूक; ठकसेनांचे 7 कोटी 81 लाख रुपये गोठविले

छत्रपती संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Back to top button