

पुणे : पॅडी आर्ट किंवा भात-रांगोळी या वार्षिक उपक्रमात यंदाच्या भात हंगामात दोन चित्रे सादर केली जाणार आहेत. यातले बियांच्या पेरणीतून केलेले पहिले चित्र 'रघु' हे ऑस्कर विजेत्या लघुपटाचा नायक असलेल्या बालहत्तीचे आहे. रघु हा वन्य प्राणी आणि आदिवासी यांच्यातील प्रेमळ नात्याचे प्रतीक आहे. हे चित्र दि. 10 ते 20 ऑगस्ट या काळात सिंहगड रस्ता, डोणजे फाट्याजवळ, लेक्झोन कारखान्याच्या आवारात पाहाता येईल. रोपांच्या लावणीतून केले जाणारे दुसरे चित्र गणपती उत्सवाच्या काळात पाहता येणार असल्याचे श्रीकांत इंगळहळीकर यांनी सांगितले.
हेही वाचा